
आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील दिल्ली पॅपिटल्स संघाने आयर्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू जॉन मूनी यांची फिल्डिंग कोच म्हणून नियुक्ती केली आहे. अहवालानुसार, मूनी लवकरच हिंदुस्थानात दाखल होऊन संघाच्या तयारीत सहभागी होणार आहेत. त्यांनी एंटोन रुक्स आणि ज्ञानेश्वर राव यांची जागा घेतली आहे.
आंतरराष्ट्रीय अनुभवाचा फायदा
44 वर्षीय मूनी यांनी आयर्लंडसाठी वन डे आणि टी-20 प्रकारात 90 हून अधिक सामने खेळले आहेत. त्यांनी 2015 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. खेळाडू म्हणून कारकीर्द संपल्यानंतर त्यांनी प्रशिक्षक म्हणूनही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. 2018 ते 2019 या कालावधीत त्यांनी अफगाणिस्तान क्रिकेट संघासाठी फिल्डिंग कोच म्हणून काम केले, तर 2019 मध्ये काही काळ वेस्ट इंडीज क्रिकेट संघासोबतही त्यांनी जबाबदारी सांभाळली. आयपीएलमध्ये मात्र ही त्यांची पहिलीच नियुक्ती ठरणार आहे.


























































