सरोगसीबाबत दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, मृत्यूनंतरही दिला जाऊ शकतो बाळाला जन्म!

delhi-high-court

दिल्ली उच्च न्यायालयाने सरोगेसीबाबत मोठा निर्णय दिला आहे. सर गंगाराम रुग्णालयात एका मृत व्यक्तीचे फ्रीज केलेले स्पर्म ठेवण्यात आले होते. मृत व्यक्तीचे गोठलेले हे स्पर्म त्याच्या पालकांकडे सोपविण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. स्पर्म किंवा एग्ज देणाऱ्या मालकाची परवानगी असेल, तर त्याच्या मृत्यूनंतरही बाळाला जन्म देण्यास कोणतेही बंधन नाही, असे उच्च न्यायालयाने सष्ट केले.

न्यायमूर्ती प्रतिभा सिंह यांनी या प्रकरणावर निर्णय दिला आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच निर्णय आहे. न्यायमूर्ती म्हणाल्या की, हिंदुस्थानी कायद्यानुसार स्पर्म किंवा एग्ज मालकाच्या सहमतीचे पुरावे सादर केले गेले तर त्यांच्या मृत्यूनंतर प्रजनन करण्यास कोणतेही बंधन नाही. त्या पुढे म्हणाल्या की, आता  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यावर विचार करेल की मृत्यूनंतर प्रजननातून संबंधित मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी कायद्याची आवश्यकता आहे की नाही.

इंदर सिंग यांचे 1 सप्टेंबर 2020 रोजी निधन झाले. त्याच वर्षी 21 डिसेंबर रोजी त्याचे पालक, गुरविंदर सिंग आणि हरबीर कौर यांनी हॉस्पिटलला गोठलेले स्पर्म सोडण्याची विनंती केली. पण ते नमुना प्राप्त करण्यात अयशस्वी झाले. त्यानंतर त्यांनी 2021 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. या दाम्पत्याची बाजू ज्येष्ठ वकील सुरुची अग्रवाल आणि अधिवक्ता गुरमीत सिंग यांनी मांडली. पालकांनी सांगितले की ते त्यांच्या दोन मुलींसह जन्माला आलेल्या कोणत्याही मुलाची संपूर्ण जबाबदारी घेण्यास तयार आहेत.

न्यायमूर्ती सिंह यांच्या खंडपीठाने पालकांच्या याचिकेचा स्वीकार करत इंदर यांनी आपले स्पर्म गोठवण्याची स्पष्ट सहमती दिली होती. प्रजनन क्षमता टिकविण्यासाठी स्पर्म गोठविण्यासाठी ते तयार होते. याचिकाकर्त्याच्या मुलाचा विचार बाळ जन्माला घालण्यासाठी त्या स्पर्मचा वापर करणे होता. ‘आई-वडिलांना त्यांच्या मुलाच्या अनुपस्थित नातवडांना जन्म देण्याची संधी मिळू शकते. आमच्या समोर कायदेशीर मुद्द्यांबरोबरच नैतिक आणि आध्यात्मिक मुद्दे असतात’, न्यायलय पुढे म्हणाले.