
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव याला दिल्ली उच्च न्यायालयाने झटका दिला आहे. धनादेश बाउंस प्रकरणात त्याला बुधवारी 4 फेब्रुवारीला दुपारी 4 वाजेपर्यंत तुरुंग अधीक्षकांसमोर शरण येण्याचे आदेश दिले आहेत. अनेकदा संधी दिल्यानंतरही राजपाल यादव याने ठरलेली रक्कम अदा केलेली नाही. हे न्यायालयीन प्रक्रियेबाबत हलगर्जीपणा दर्शवतो, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.




























































