मुलीचा मोबाईल नंबर सांगितला नाही म्हणून डोक्यावर फोडली बिअर बाटली

839

एकतर्फी प्रेमातून आजवर अनेक गुन्हे झालेले आहेत. अशीच एक घटना दिल्लीतील मयूर विहार येथे घडली असून एका दुकानदाराच्या डोक्यात काही माथेफिरूंनी बिअरची बाटली फोडली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मयूर विहार येथील एका भंगार दुकानात ही घटना घडली. गुरुवारी संध्याकाळी एक तरुणी भंगाराचं सामान घेऊन या दुकानात विक्रीसाठी आली होती. तिचं काम झाल्यावर ती तिथून निघून गेली. ती गेल्यानंतर लगेचच दोन ते तीन जणांचं टोळकं दुकानात आलं. त्यांनी दुकानाच्या मालकाकडे तरुणीचा मोबाईल नंबर मागितला.

दुकानदाराने त्यांना आपल्याकडे नंबर नाही, असं सांगितलं. त्यावर संतापलेल्या तिघांनी त्याला शिवीगाळ करायला सुरुवात केली. संतापाच्या भरात त्यातील एका आरोपीने शेजारी पडलेली बिअरची रिकामी बाटली उचलली आणि त्याच्या डोक्यावर फोडली. या घटनेत दुकानदाराच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून या तिन्ही आरोपींचा शोध सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या