एक देश, एक निवडणूक, मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ‘एक देश, एक निवडणूक’ या विषयावर या बैठकीमध्ये चर्चा होणार असून देशातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी 20 जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्यांशी चर्चा करतील, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.

काँग्रेसचा विरोध
मोदी सरकार सुरुवातीपासून ‘एक देश, एक निवडणूक’ यावर ठाम आहे. परंतु काँग्रेसचा मात्र याला कायम विरोध राहिला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात हा मुद्दा पुन्हा वर आला तेव्हाही काँग्रेसने याचा तीव्र विरोध केला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि पी. चिदंबरम यांसह अन्य नेत्यांनी याला विरोध दर्शवला होता.