बलात्कार पीडितेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, आरोपी ठेवलेल्या तुरुंगात छोटा राजन व डॉन शहाबुद्दीन असल्याने खळबळ

1219

दिल्लीत कोरोना विषाणूचा फैलाव वाढत असतानाच सोमवारी एक खळबळजनक बातमी आली. येथे एका बलात्कार पीडितेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या प्रकरणातील आरोपीला तिहार तुरुंगामध्ये ठेवण्यात आले असून याच तुरुंगात कुख्यात आरोपी छोटा राजन आणि डॉन शहाबुद्दीन असल्याने खळबळ उडाली आहे. पीडितेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोपीला तुरुंगातच क्वारंटाईन करण्यात आले आहे. ‘झी न्यूज’ने याबाबत वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, बलात्कार प्रकरणातील आरोपीला काही दिवसांपूर्वी तिहार तुरुंगातील क्रमांक 2 च्या जेलमध्ये ठेवण्यात आले होते. पीडितेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोपीसह अन्य दोन कैद्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र इतर कैद्यांमध्ये घबराट पसरल्याने तिहार तुरुंग प्रशासनाने विषाणूच्या चाचणीची तयारी केली आहे.

तिहार तुरुंग प्रशासनाने याबाबत माहिती देताना सांगितले की, पीडितेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आरोपीची कोविड-19 चाचणी करण्यात येईल. तसेच तुरुंगात आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला असून कैद्यांची स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. तुरुंगात आलेल्या नवीन कैद्यांवर फॉकस असणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. विशेष म्हणजे आरोपीला ज्या क्रमांक दोनच्या सेलमध्ये ठेवण्यात आले होते तिथेच छोटा राजन आणि डॉन शहाबुद्दीन असल्याने खळबळ उडाली. मात्र तुरुंग प्रशासनाने त्यांच्याशी इतर कैद्यांचा संपर्क नसल्याची पुष्टी केली आहे.

दिल्लीचा आकडा वाढताच
देशासह दिल्लीचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे. देशात एकूण 67,152 रुग्ण असून यातील 6,923 एकट्या दिल्लीतील आहे. येथे 73 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे, तर 20,69 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या