दिल्लीत घबराट! अनेक नामांकित शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; विद्यार्थ्यांसह शिक्षकांना सुरक्षितपणे बाहेर काढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

देशाची राजधानी दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्यांचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी सकाळी दिल्लीतील अनेक नामांकित शाळांना धमकीचे ईमेल मिळाल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.

दिल्ली पोलीस, अग्निशमन दल आणि बॉम्ब शोधक पथक (BDS) विविध शाळांच्या परिसरात दाखल झाले असून कसून तपासणी केली जात आहे. झेंडेवालान येथील बी.टी. तमिळ स्कूल, सरदार पटेल विद्यालय आणि ब्रिटीश स्कूल यांसारख्या मोठ्या शाळांना हे धमकीचे ईमेल आले आहेत. सकाळी साधारण ९:१२ च्या सुमारास पोलिसांना या संदर्भात माहिती मिळण्यास सुरुवात झाली.

विशेष म्हणजे, गेल्या एका आठवड्यात दिल्लीतील शाळांना धमकी मिळण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी ९ फेब्रुवारी रोजी १५ हून अधिक शाळांना अशाच प्रकारचे ईमेल आले होते. शुक्रवारी आलेल्या ईमेलसाठी एका निनावी ईमेल आयडीचा वापर करण्यात आला असून पोलीस त्याचा तांत्रिक तपास करत आहेत.

शाळा प्रशासनाने पालकांना संदेश पाठवून परिस्थितीची माहिती दिली आहे. ‘सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारी म्हणून शाळा रिकामी करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे. सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत,’ असे शाळांकडून कळवण्यात आले आहे. सुदैवाने, आतापर्यंतच्या तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.

खलिस्तानी कनेक्शनचा संशय?

या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी १३ शाळांना ‘झाचरी जेन्किन्स’ नावाच्या युजरकडून ईमेल आले होते. त्यात ‘अफजल गुरुच्या स्मृतीप्रत्यर्थ दिल्ली खलिस्तान होईल’ असा उल्लेख होता. ‘खलिस्तान नॅशनल आर्मी’च्या नावाने पाठवलेल्या या पत्रात संसदेवरही हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. मात्र, तपासानंतर या धमक्या अफवा (Hoax) असल्याचे स्पष्ट झाले होते. दिल्लीनंतर चंदीगड आणि मोहालीतील शाळांनाही अशाच धमक्या मिळाल्या होत्या.

fresh bomb threats to delhi schools students evacuated police search ops

Several schools in Delhi including British School and Sardar Patel Vidyalaya received bomb threat emails on Friday. Police evacuated students and initiated search operations.

Keywords: delhi school bomb threat news, british school delhi bomb mail, delhi police bomb squad, schools evacuated in delhi, khalistan national army email threat, school security delhi