
कारवाई केल्याचा राग डोक्यात गेल्याने वाहतूक पोलिसांचे ई-चलन मशीन फोडणाऱ्या डिलिव्हरी बॉयला एमएचबी पोलिसांनी अटक केली. अमित रामनवल गुप्ता असे त्याचे नाव असून त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
एमएचबी वाहतूक चौकीत पोलीस नाईक मंगेश बोर्डवेकर हे काम करतात. गेल्या आठवडय़ात ते दहिसर पश्चिमच्या डी. मार्ट येथे डय़ुटीला असताना त्यांनी अमितला थांबवत ई-चलनची कारवाई केली. त्यावेळी बोर्डवेकर यांच्याकडील असलेली ई-चलनची मशीन फोडली. सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी बोर्डवेकर यांनी एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अमितविरोधात गुन्हा दाखल केला. पळून गेलेल्या अमितच्या शोधासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली. त्यानुसार पोलिसांनी अमितला गणपत पाटील नगर येथून अटक केली.






























































