पवईत झोमॅटो डिलीव्हिरी बॉयचा खून, आरोपीला अटक

1241
murder-knife

पवईमध्ये क्षुल्लक कारणावरूने एका फळविक्रेत्याने झोमॅटो डिलीव्हरी बॉयचा खून केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

रात्री साडे बारा वाजता फळ विक्रेता सचिन सिंह आणि त्याचा साथीदार हरिरामने एका हॉटेलच्या बाहेर फळाची हातगाडी लावली होती. तेव्हा अमोल सूरतकर या डिलीव्हरी बॉयची या दोघांशी या ठेल्यावरून वाद झाला. या वादाचे रुपांतर भांडणात झाले. तेव्हा सचिन सिंहने चाकूने अमोलला भोसकले. या हल्ल्यात अमोलच्या हृदयावर आणि पोटात गंभीर जखम झाली. त्याला तत्काळ जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. तेव्हा त्याला मृत घोषित करण्यात आले.

पोलिसांनी नंतर आरोपींचा शोध घेतला. दोन्ही आरोपी उत्तर प्रदेशला पळण्याच्या तयारीत होते, तेव्हा पोलिसांनी त्यांना कुर्ला स्थानकावरून अटक करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या