नॅशनल पार्कमधील रहिवाशांचे मरोळमध्येच पुनर्वसन करण्याची मागणी

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील झोपडीवासीयांचे पुनर्वसन मरोळ-मरोशी येथील ठरलेल्या जागेवरच करावे, या मागणीसाठी 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या सभागृहात या रहिवाशांचा मेळावा जनता दल (से.) मुंबई आणि बेघर झोपडपट्टी गोरगरीब रहिवासी संघटना यांच्यातर्फे आयोजित केला आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील झोपडीवासीयांचे मरोळ–मरोशी येथे पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र या 18 हजार कुटुंबांचे मरोळ-मरोशी येथे पुनर्वसन झाल्यास मतदार म्हणून आपल्याला त्यांचा वापर करता येणार नाही, या भूमिकेतून शिंदे गटाच्या स्थानिक पुढाऱयांनी या रहिवाशांचे मूळ जागेजवळच पुनर्वसन झाले पाहिजे, अशी भूमिका घेतल्याने हा प्रकल्प बारगळला. पुनर्वसनासाठी आता नव्या जागेचा शोध सुरू केला आहे. मात्र या रहिवाशांचे मरोळमध्येच पुनर्वसन करा अशी भूमिका जनता दल सेक्युलर मुंबई पक्षाने घेतली आहे. मुंबई जनता दलाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर, बेघर रहिवासी संघटनेच्या अध्यक्ष दिव्या परब, दीपेश परब, विजय कनोजिया, सूरज सिंग, श्रीकांत कुसेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.