
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2023 मध्ये चलनातून बाद केलेल्या 2000 रुपयांच्या नोटा अजूनही संपूर्णपणे बँकेत परत आलेल्या नाही. अजूनही पाच हजार कोटी रुपयांहून जास्त किमतीच्या दोन हजाराच्या नोटा बँकेत परत येण्याचे बाकी आहे. अद्यापपर्यंत 98.41 टक्के गुलाबी नोटा परत आल्या आहेत. आरबीआय 2000 रुपयांच्या नोटा 19 मे 2023 रोजी कामकाजातून बाहेर केल्या होत्या. या नोटा बँकेत परत करायच्या होत्या, परंतु आतापर्यंत सर्व नोटा बँकेत परत केलेल्या नाहीत. त्यावेळी बाजारात 3.56 लाख कोटी रुपयांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा होत्या. संपलेल्या 31 डिसेंबर 2025 पर्यंत 5,669 कोटी रुपये मूल्यांच्या 2000 रुपयांच्या नोटा बँकेत परत आलेल्या नाहीत.




























































