डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण दुपटीने वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत पावसाने विश्रांती घेतल्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवडय़ात आटोक्यात आलेल्या पावसाळी आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. मुंबईत 1 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत मलेरियाचे 211 रुग्ण, डेंग्यू – 250, लेप्टो – 11 रुग्ण आढळले होते. मात्र 8 ते 15 ऑक्टोबर या आठ दिवसांत मलेरिया, डेंग्यू, लेप्टो रुग्ण संख्येत दुपटीने काढ झाली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.
पाणी साचून राहत असल्याने दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफॉईड, कॉलरा, कावीळ असे आजार तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार पसरतात. हे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घर-परिसर स्कच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.