विदर्भात डेंग्यूने थैमान,7 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नागपूर

पूर्व विदर्भात सध्या डेंग्यूने चांगलेच थैमान घातले आहे. आत्तापर्यंत पुर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये डेंग्यूच्या 592 रुग्णांची नोंद झाली असून 7 जणांचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. मागील वर्षापेक्षा यंदाची आकडेवारी जवळपास पाच पटीने जास्त असल्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये डेंग्यूने थैमान घातले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा या विभागात डेंग्यूचे रुग्ण पाच पटीने वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. गेल्या वर्षी डेंग्यूच्या रुग्णाची संख्या 103 होती. तर डेंग्यूमुळे 6 रुग्णांचा मृत्यू झाला होता. मात्र यंदा आत्तापर्यंत 592 रुग्णांची नोंद झाली असून 7 जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. सध्याची परिस्थीती लक्षात घेता या आकडेवारीत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.त्यामुळे डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणा आणि नागरिकांवर आहे.