13 सेकंदांत 20 गाडय़ांखालून केलं स्केटिंग, देशना नहारची गिनीज बुकात नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्याच्या देशना नहार या सात वर्षीय मुलीने लिंबो स्केटिंग या अत्यंत अवघड स्केटिंग स्पर्धेत विश्वविक्रम केला आहे. देशना हिने 13.74 सेकंदांत 20 चारचाकी गाडय़ांखालून स्केटिंग केले. तिच्या कामगिरीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

देशना नहारला प्रशिक्षक विजय मलजी यांचे मार्गदर्शन लाभले. ती पुण्याच्या हचिंग स्कूलमध्ये इयत्ता तिसरीत शिकत आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून तिला स्केटिंगची आवड निर्माण झाली. मागील दोन वर्षे स्केटिंगचे प्रशिक्षण घेत तिने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. मागील दोन वर्षे देशना स्केटिंग शिकत आहे. तिच्या आजीने तिच्यासाठी विशेष मेहनत घेतली. तिच्या मेहनतीला यश आले. तिच्या विश्वविक्रमाने आम्ही खूप आनंदित आहोत, असे देशनाचे वडील आदित्य नहार यांनी सांगितले.