देव आनंद @100, गाइड, सीआयडी, हम दोनो पुन्हा प्रदर्शित होणार

दिवंगत सदाबहार अभिनेते देव आनंद यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त फिल्म हेरिटेज फाऊंडेशन दोन दिवसांच्या महोत्सवाचे आयोजन करणार आहे. या काळात त्यांचे चित्रपट मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद, त्रिवेंद्रम, चेन्नई, बेंगळुरू, कोलकाता, लखनौ, गुवाहाटी, इंदूर, जयपूर, नागपूर, दिल्ली अशा 30 शहरांतील 55 सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित केले जातील.

26 सप्टेंबर हा देव आनंद यांचा जन्मदिवस. त्याच्या दोन दिवस आधी म्हणजे 23 आणि 24 सप्टेंबर रोजी हा महोत्सव होईल. फिल्म हेरिटेज फाउंडेशन, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया आणि पीव्हीआर आयनॉक्स यांच्या संयुक्त विद्यमाने देव आनंद यांची जन्मशताब्दी अनोख्या पद्धतीने साजरी होईल. आनंद@100 – फॉरएव्हर यंग! अशी या महोत्सवाची थीम आहे. याअंतर्गत हम दोनो, ज्वेल थीफ, तेरे घर के सामने, सीआयडी, गाइड,
जॉनी मेरा नाम हे चित्रपट दाखवले जाणार आहेत.