देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, पाच जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील वाहनांनी धडक दिल्यामुळे पाच जण जखमी झाल्याची घटना गडगा-मुखेड रोडवरील बेळी फाटा येथे रविवारी दुपारी घडली आहे.

देवेंद्र फडणवीस लातूर नांदेडच्या दौऱयावर होते. बेरळी फाटा येथे राजे छत्रपती अकॅडमीजवळ ताफ्यातील वाहनाने एका पोलीसासह दोन मोटरसायकल आणि एका मालवाहू जीपला धडक दिली. या घटनेत पाच जणांना दुखापत झाली असून बालाजी पवार, राजेश जाधव, जमादार नामदेव दोसलवार, समीर भिसे व अरविंद मोरे अशी त्यांची नावे आहेत. गेल्या तीन महिन्यात फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीला झालेला हा दुसरा अपघात आहे. 8 जुलै रोजी मुंबई ते नागपूर महामार्गावर नशिराबाद येथे फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीचे ब्रेक फेल होऊन गाडय़ांची एकमेकांना धडक झाली होती. त्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर किरकोळ जखमी झाले होते.