राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे, त्या भागातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची आवश्यकता आहे. अतिवृष्टी झालेल्या झालेल्या भागात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेतील विरोधी नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

विधान परिषेदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी अतिवृष्टी झालेल्या मराठवाडय़ातील जिह्यांना भेट देऊन पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी नुकसानग्रस्त शेतीची पहाणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि शेतकऱ्यांना सरकारकडून असलेल्या अपेक्षा याबाबत त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी प्रत्यक्ष चर्चा केली. त्या भागातील परिस्थितीचे निवेदन प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. निवेदनातील मागण्यांबाबत सरकारी पातळीवर त्वरित सकारात्मक निर्णय घेण्याची मागणीही यामध्ये करण्यात आली आहे.