
अशोक खरात या तथाकथित भोंदूबाबा प्रकरणात ज्यांचा कुणाचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यांना सोडणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात दिले. अशोख खरात प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला घेरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सांगितले.
”जे घडलंय ते गंभीर आहे या व्यक्तीने आपल्या तथाकथित शक्तींचा दुरुपयोग करून अनेक महिलांसोबत गुष्कृत्य केल्याचे समोर येतंय. यासंदर्भातील कारवाई आपल्या पोलिसांनी प्रोअॅक्टिव्हली केली आहे. यात महिला सहभागी असल्याने त्यांची फसवणूक झाली आहे. पण त्या समोर यायला तयार नव्हत्या. त्यांना योग्य पद्धतीने धीर दिल्यानंतर त्यांनी तक्रार केली आहे. काही आणखी महिला समोर येतील. या संदर्भात कारवाई जरी आता झाली तरी त्याची तयारी आधीपासून सुरू होती. त्यांच्या अटकेच्या अगोदरच 10/3 ला दुसऱ्या जिल्ह्यातून तक्रार करून त्यांच्या LOC देखील काढून ठेवला होता. उद्या याचं डिटेल निवेदन देईन. हा राजकारणाचा नाही तर महिलांच्या आत्मसन्मानाचा विषय आहे. महिलांचं ब्रेनवॉशिंग केलं गेलं आहे. उद्या या संदर्भात सखोल निवेदन करेन”, असे फडणवीस म्हणाले.


























































