विकास प्रकल्पात दिरंगाई करणाऱ्या बिल्डरवर कारवाई – देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विकास प्रकल्पांमध्ये दिरंगाई करणाऱया 100 पेक्षा अधिक विकासकांना अपात्र केले आहे. पण या विकासकांची स्वतंत्र सुनावणी घेण्याचे कोर्टाने आदेश दिले आहे. त्यामुळे प्रत्येक विकासकाची स्वतंत्र सुनावणी घेऊन विकास प्रकल्पात दिरंगाई करणाऱया विकासकांवर कारवाई करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिले.

मुंबई शहरामध्ये विकासकांना विकसित करण्यासाठी देण्यात आलेली रुग्णालये, शाळा आदींची कामे सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण होऊनही मागील चार-पाच वर्षांपासून ही कामे रखडत आहेत. अशा अनेक मालमत्ता विकासकांनी विकसित करून महापालिकेला हस्तांतरित केलेल्या नाहीत. त्यामुळे या मालमत्ता सरकारने ताब्यात घेऊन त्यांचा विकास करण्याची मागणी काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान केली. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.