देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात कोरोनाची रुग्णवाढ होत असताना सर्वत्र दिसत आहे. आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही कोरोनाची लागण झाली असून ते सध्या गृह विलगीकरणात (होम आयसोलेशन) आहेत. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः ट्विटरवरून दिली आहे. आपल्या संपर्कात आलेल्यांनी त्वरित कोरोना तपासणी करून घेण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले आहे.

शाहरुखलाही लागण

एकीकडे करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या 55 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली असताच एकामागोमाग एक बॉलीवूड सेलिब्रेटीदेखील कोरोना संक्रमित झाल्याचे समजतेय. कार्तिक आर्यन, आदित्य रॉय कपूर, कतरिना कैफ यांच्यानंतर आता अभिनेता शाहरुख खानची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे.