गढीताम्हाणे गावामध्ये बिबट्याचा धुमाकूळ, दुभत्या गाईचा फडशा पाडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवगड तालुक्यातील गढिताम्हाणे गावात बिबट्याने धुमाकूळ घातला असून गढिताम्हाणे गावातील शेतकरी विनोद शंकर कदम यांची दुभती गाय 5 सप्टेंबर रोजी सकाळी चरण्यासाठी रानात सोडली होती. मात्र सायंकाळी घरी आली नाही म्हणून शोधा शोध केली असता दुसऱ्या दिवशी बिबट्याने अर्धवट खाल्लेल्या स्थितीत सापडली. याबाबत वनविभागाला कळविण्यात आले. वनपाल सादिक फकीर यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीचा रीतसर पंचनामा केला.