देवगड- आदर्श ग्रामयोजनेअंतर्गत 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

345

सांसद आदर्श ग्रामयोजनेतर्गत देवगड तालुक्यातील तळवडे, बागतळवडे या गावांमध्ये सुमारे 2 कोटीच्या विकास कामांचा शुभारंभ खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

या विकास कामांमध्ये बागतळवडे रस्ता रु 5 लाख, तळवडे ग्रा प . विस्तारीकरण रु 10 लाख, तळवडे खारबंधारा रु.48 लाख, न्हावन कोंड धबधबा येथे चेंजीग रुम रु. 20 लाख, पार्किंग व्यवस्था रु. 20 लाख, सिमेंट बंधारा रु 25 लाख या महत्त्वाच्या कामांचा समावेश असून या व्यतिरिक्त तलेबाजार तलाव सुशोभीकरणाकरिता विशेष बाब म्हणून 3.25 कोटी एवढ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे असे खासदार राऊत यांनी सांगितले.

या दौऱ्यात खासदार विनायक राऊत यांच्या समवेत जिल्हाप्रमुख संजय पडते,उपसभापती संजय देवरुखकर, उपजिल्हाप्रमुख,विलास साळसकर,महिला आघाडी प्रमुख नीलम सावंत पालव,मानसी दळवी, सचिन सावंत, राजू राठोड, सरपंच गणेश लाड, गोविद उर्फ पपु लाड,बुवा तारी, निनाद देशपांडे, निलेश सावंत कोले गुरुजी, केतन खाडये,श्वेता शिवलकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या