देवगडमध्ये 23 ग्रामपंचायतींसाठी 6 उमेदवारी अर्ज दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवगड तालुक्यात होणाऱ्या 23 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी 6 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार मारुती कांबळे यांनी दिली. यात मुटाट 1 व रहाटेश्वर ग्रामपंचायतीतील 5 उमेदवारी अर्जांचा समावेश आहे.

देवगड तालुक्यात एकूण 23 ग्रामपंचायतीच्या निवडणूक होत आहे. यात एकूण 71 प्रभाग असून 189 सदस्य आहेत. या निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये देवगड तालुक्यातील कातवण, टेंबवली, पाटथर,धालवली,कोरले,पाळेकरवाडी, गंढिताम्हणे,रहाटेश्वर, मोंड,तांबळडेग लिंगडाळ,मुणगे,मिठबाव,इळये,कुणकेश्वर,वाडा, मुटाट,नाडण,मोंडपार,वरेरी,तळवडे,पुरळ, शिरगाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यासाठी 23 निवडणूक निर्णय अधिकारी देवगड तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारत येथे उपस्थित राहणार आहेत.