
श्रीक्षेत्र जेजुरी येथील कडेपठारच्या डोंगरातील खंडोबाच्या दर्शनाला जाताना एका भाविकाचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.संजय महादू थेटे (55) असे या भाविकांचे नाव आहे.
रविवार असल्याने कडेपठारच्या डोंगरावर भाविकांची मोठी गर्दी होती. संजय थेटे हे आपल्या कुटुंबीयांसह जेजुरी यात्रा करण्यासाठी आले होते. कडेपठारच्या दर्शनासाठी जाताना ते पायऱया चढत होते, यावेळी त्यांना दम लागला. खूप घाम आला व हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते जागीच कोसळले. देवस्थानचे कर्मचारी मयूर खोमणे, शिवाजी भंडलकर, अनिकेत कुदळे, धनंजय नाकाडे यांनी त्यांना उचलून खाली पायथ्याशी आणले. मार्तंड देवस्थानच्या रुग्णवाहिकेतून त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. संजय थेटे यांचा दिंडोरी येथे फोटोग्राफीचा व्यवसाय असून, ते एका दैनिकाचे वार्ताहर होते.





























































