
नोटबंदी होऊन आता तीन वर्षे होतील. तरी काही लोकांकडे अजूनही पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा आहेत. म्हणून काही लोकांनी शक्कल लढवत या जुन्या नोटा साईचरणी टाकल्या आहेत.
चंदीगडच्या सेक्टर 29 मध्ये शिरडी साई बाबा मंदिरातील दानपेटी एक महिन्यानंतर उघडली. तेव्हा दानपेटीत पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा सापडल्या. त्यात आठ नोटा हजारच्या आहेत. तर दहा नोटा पाचशे रुपायांच्या नोटा आहेत. एकूण 13 हजार रुपयांच्या नोटा दानपेटीत सापडल्या आहेत. दोन वर्षापूर्वी अशा जुन्या नोटा दानपत्रात सापडल्या आहेत. नोटाबंदीच्या काळात तब्बल ७०-८० लाख रुपयांच्या नोटा दानपेटीत जमा झाल्या होत्या. त्यानंतरही पाच लाख रुपयांच्या नोटा दानपेटीत मिळाल्या होत्या. सर्व नोटा विश्वस्तांनी सध्या जमा केल्या आहेत.


























































