देवरुख शाळा नं.४ झाली पुर्णपणे डिजिटल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । देवरुख

देवरुख शहरातील छञपती शिवाजी आदर्श विद्यामंदिर शाळा नं.४ ला देवरुख लायन्स क्लब अध्यक्ष नितीन शेडगे यांनी संगणक संच भेट म्हणुन दिला. या संगणकामुळे आता बाराही वर्गखोल्यात संगणक प्रणाली बसल्यामुळे ही शाळा पुर्णपणे डिजिटल झाली आहे. लायन्स क्लब देवरुखकडुन आणखी शैक्षणिक साहित्य पुरवले जाणार आहे.

देवरुख शाळा नं. ४ मध्ये शासनाच्या धोरणानुसार पर्यावरण रक्षणासाठी व ध्वनीप्रदुषण रोखण्यासाठी आम्ही फटाके वाजवणार नाही, प्लास्टिक पिशवी वापरणार नाही अशी मुलांना शपथ देण्यात आली. याच कार्यक्रमात नितिन शेडगे व लायन्स सभासद सौ.निलम हेगशेट्ये यांनी लायन्स क्लब तर्फे संगणक शाळेला भेट दिला. यावेळी मुख्याध्यापक संभाजी पाटील, शिक्षक सागवेकर, बांडागळे गुरुजी, संभाजी आंब्रे, सुरेंद्र शिंदे, सौ.अपेक्षा पवार, सौ.मंदा सावंत, प्रमोद हर्डीकर आदी उपस्थित होते.

यावेळी लायन्स क्लब अध्यक्ष नितिन शेडगे यांनी शिक्षकांनी मुलांचा कल पाहुन त्यांना तसे शिक्षण देणे गरजेचे असल्याचे सांगून ज्या विषयात मुलाला गती आहे त्या विषयावर त्याची तयारी करुन घेण्याचे आवाहन केले. मुलांना समजावून शिक्षण देण्याची गरज आहे, हे स्पष्ट केले. डीजिटल यंञणेमुळे मुलांना ऐकणे, पाहणे, बोलणे यामुळे गहन विषयांचे आकलन लवकर होते, असे स्पष्ट केले. संभाजी पाटील यांनी देणगीबाबत शेडगे व हेगशेट्ये यांचे आभार मानले. देवरुख शाळा नं.४ आता परीपूर्णतेकडे वाटचाल करत आहे, असे पाटील यांनी नमुद केले.