देवरुख भंडारवाडीत वादळाने घरावर झाड पडले, सुदैवाने जिवीत हानी नाही

653

निसर्ग वादळाने आज पहाटे पासून वेग घेताच संगमेश्वर तालुक्यात पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे . पावसामुळे माती ओली होवून संगमेश्वर तालुक्यातील देवरुख भंडारवाडीत घरावर झाड कोसळले . सुदैवाने घराचे मोठे नुकसान होण्यावर निभावले असून कोणीही जखमी झालेले नाही .

संगमेश्वर तालुक्यात सद्यस्थितीत वाऱ्याचा आणि पावसाचा वेग वाढला असून अद्याप अन्य ठिकाणी नुकसान झाल्याचे कोणतेही वृत्त नाही . खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणने सकाळी ६:४५ पासून वीजपुरवठा बंद केला आहे . दरम्यान संगमेश्वर तालुक्याच्या फुणगूस खाडी भागात वेगाने वारे वहात असून पावसाचा जोर वाढला आहे . परिसरातील मच्छिमारांनी एक जून पासूनच आपल्या होड्या किनाऱ्यावर ओढल्या आहेत .

संगमेश्वर तालुक्यात दररोज मासेमारीला जाणारे गोपाळ आणि भोइ समाजातील मच्छिमारांनी काल दोन जूनला सायंकाळी घर गाठणे पसंत केले . आज यातील एकही मच्छिमार झाडी अथवा नदीकिनारी मच्छीमारीसाठी गेलेला नाही अशी माहिती मिळाली आहे . वादळामुळे आज जनता कर्फ्यु असल्याने संगमेश्वर तालुक्यात नागरिक घरातच बसून असल्याचे दिसून येत आहे . रस्त्यावरील वाहतूकही पूर्णत: बंद आहे .

आपली प्रतिक्रिया द्या