भाजपकडून ‘डीजीपी’ पांडेंना नाही, कॉन्स्टेबल चतुर्वेदींना उमेदवारी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जदयु पाठोपाठ भाजपनेही बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना ठेंगा दाखविल़ा विशेष म्हणजे बक्सर मतदारसंघातून भाजपने माजी ‘डीजीपी’ पांडे यांना नाही तर निवृत्त कॉन्स्टेबल परशुराम चतुर्वेदी यांना विधानसभेची उमेदवारी दिली.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलिसांची बदनामी केली होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पांडे यांनी बेछूट आरोप केले होते. विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी गेल्या महिन्यात पोलीस महासंचालक पदावरून स्वेच्छा निवृत्ती घऊन गुप्तेश्वर पांडे यांनी मुख्यमंत्री नितीश पुमार यांच्या उपस्थितीत जदयुमध्ये प्रवेश केला.

बिहारमध्ये जदयु आणि भाजपची ‘एनडीए’ आहे. जदयुने बुधवारी उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात पांडे यांचा पत्ता कट केला. पांडे बक्सर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र जागा वाटपात बक्सर भाजपकडे आहे. भाजप तरी उमेदवारी देईल, अशी पांडे यांना आशा होती. मात्र, भाजपने आज जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत गुप्तेश्वर पांडे यांना उमेदवारी
दिलेली नाही.

हताश, नाराज नाही; मला फोन करू नका – गुप्तेश्वर पांडे
हितचिंतकांच्या पह्नमुळे मी त्रस्त आहे. पोलीस सेवेतून निवृत्त झालो तेव्हा सर्वांना अपेक्षा होती ती निवडणूक लढवेन. पण यावेळी लढणार नाही. पण हाताश, निराश होण्यासारखे नाही. संयम ठेवा, मला फोन करू नका, असे गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटले आहे.