परळीत धनंजय मुंडेविरोधात निषेध मोर्चा

1647

राज्याच्या ग्रामविकामंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबत ऱाष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी केलेल्या  आक्षेपार्ह वक्तव्याचे आज तालुक्यात संतप्त पडसाद उमटले. आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा नेत धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

dhananjay-munde-parli-prote

शनिवारी परळी येथे प्रचाराच्या सांगता प्रसंगी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या विषयी अपशब्द वापरल्याचे कळताच रविवारी सकाळी पंकजा मुंड यांचे समर्थक मोनिका राजळे यांच्या पाथर्डी येथील निवासस्थानी जमले. त्या नंतर मोनिका यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशनवर पायी मोर्चा काढण्यात आला. मोर्चा मध्ये मोनिका राजळे यांच्यासह नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे,अभय आव्हाड,बजरंग घोडके,विष्णुपंत अकोलकर,महिला तालुकाध्यक्षा काशीबाई गोल्हार,शहराध्यक्षा ज्योती मंत्री,नगरसेविका दीपाली बंग यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चेकऱ्यांनी धनंजय मुंडे यांचे करायचे काय? खाली डोके वर पाय, धनंजय मुंडे यांचा निषेध असो अशा घोषणा दिल्या. मोर्चा नाईक चौकात आल्या नंतर तेथे काही काळ धरणे आंदोलन  करण्यात आले.

या वेळी बोलताना मोनिका राजळे म्हणाल्या कि पंकजा मुंडे या आमच्या दैवत असून धनंजय मुंडे यांनी त्यांच्या विषयी जे अपशब्द काढले हा सर्व महिलांचा अपमान आहे. राजकीय टीका टिपण्णी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र खालच्या पातळीवर टीका करून धनंजय मुंडे यांनी महिला विषयी अनादर केला आहे. त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा तसेच त्यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी परळी येथे अगोदरच गुन्हा दाखल केला असल्याने पुन्हा येथे गुन्हा दाखल करता येणार नाही असे सांगितल्या नंतर काही वेळ तणाव निर्माण झाला होता. या नंतर तक्रार अर्ज तुम्ही द्या आम्ही तक्रार नोंदवून परळीला पाठवू असे आश्वासन रत्नपारखी यांनी दिल्या नंतर मोर्च विसर्जित करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या