
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकासह अन्य कर्मचारीही बाधित असल्याचे समोर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत धनंजय मुंडे सहभागी झाले होते.
धनंजय मुंडे संपर्कात आले असतील किंवा कागदपत्रांची देवाणघेवाण केली असेल अशांनी व त्यांच्या निकटवर्तीयांनी संपूर्ण कुटुंबासमवेत होम क्वारंटाईनची कडक अंमलबजावणी करावी आणि कोरोनाची लक्षणे दिसल्यास ताबडतोब जवळच्या शासकीय आरोग्य सुविधांना कळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

























































