
हिंदुस्थानचा क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि अभिनेत्री धनश्री वर्मा सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा काही महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला होता. घटस्फोटाच्या दिवशी शुगर डॅडी टी-शर्ट घालण्याबाबतही त्याने आपली बाजू मांडली. धनश्रीने मात्र या संदर्भात अवाक्षरही काढले नव्हते. दरम्यान आता धनश्री वर्मा पहिल्यांदाच घटस्फोटाबद्दल बोलली आहे. अभिनेत्री धनश्रीने घटस्फोटाच्या वेळी कोर्टात तिची काय अवस्था होती ते सांगितले.
युझवेंद्र चहलने एका पॉडकास्टमध्ये त्याच्या घटस्फोटाबद्दल भाष्य केले होते. त्यांला कोणताही ड्रामा नको होता, पण त्या एक संदेश द्यायचा होता. यासाठी घटस्फोटाच्या दिवशी शुगर डॅडी टी-शर्ट घालून त्याने सडेतोड उत्तर दिले होते. दरम्यान आता धनश्रीने घटस्फोटानंतर मौन सोडले आहे.
ह्युमन ऑफ बॉम्बे पॉडकास्टला मुलाखत देताना, धनश्री वर्माने घटस्फोटावर भाष्य केलं. घटस्फोटाच्या वेळी मी खूप रडले होते. खूप भावनिकही झाले होते, असे तिने सांगितले. मी तो अनुभव सांगू शकत नाही पण तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता आणि मी रडत होते. कोर्टाच्या निर्णयानंतर, युजवेंद्र चहल प्रथम कोर्टातून बाहेर आला. यावेळी त्याने शुगर डॅडी टी-शर्टबद्दलही भाष्य केलं होते. हे सगळ खूप भयंकर होतं, असे तिने सांगितले.
ती पुढे म्हणाली की, मला माहिती होतं लोक मलाच दोष देतील… हा टी-शर्ट स्टंट झाला आहे. खरं तर माझा यासगळ्यावर विश्वासच बसत नव्हता. कोर्टातून बाहेर येताच आम्ही गाडीत बसलो होतो, तेव्हा माझ्या आयुष्याबद्दल विचार माझ्या मनात येऊ लागले. मग मी माझा फोन काढला आणि पाहिलं की, खरोखर त्यानं ते वाक्य लिहिलेलं टी-शर्ट घातलेलं… आणि एका सेकंदात लाखो विचार माझ्या मनात आले. आता हे होईल, ते होईल, त्या क्षणी मी विचार करू लागले की, आता पुरे झालं, मी का रडू? मी प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीत त्याला पाठिंबा दिला आहे. असे तिने सांगितले.
मुलाखतकाराने धनश्रीला सांगितलं की, युजवेंद्र चहलनं एका मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं की, त्याला त्याचा मेसेज द्यायचा होता म्हणून त्याने तो टी शर्ट घातला होता. यावर धनश्री म्हणाली की, “अरे भाई, मला व्हॉट्सअॅप केलं असतं. टी-शर्ट का घालायचाय? बघा प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. मी शांत होते काहीही बोलत नव्हते, याचा अर्थ असा नाही की, तुम्ही त्याचा फायदा घ्यावा.