
सामना प्रतिनिधी । राहाता
भाजपा सरकारने धनगर समाजास आरक्षाच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरण्याची वेळ आणली. यापुढे शांततेच्या मार्गाने आंदोलने व करता उग्रस्वरुपाची आंदोलने करावी लागतील. आमदार, खासदार व मंत्र्यांच्या गाड्या फोडाव्या लागतील. पहिल्या गाड्या धनगर ससमाज्याचे मंत्री महादेव जानकर, राम शिंदे, व खासदार डॉ.विकास महात्मे यांच्या फोडाव्या लागतील तरच घटनेने दिलेले न्याय हक्काचे एसटी आरक्षण मिळेल असे प्रतिपादन दत्तात्रय खेमनर यांनी केले.
राहाता येथे धनगर समाज्याच बांधवांनी ग्रामदैवत वीरभद्र देवस्थान ते तहसील कार्यालयावर पारंपारीक डफांच्या निनादात भव्य मोर्चा काढून शासनाच्या निषेधाच्या घोषना देत रोष व्यक्त केला. तहसील कार्याजवळ मोर्चाचे रुपांतर सभेत झाले त्यावेळी खेमनर बोलत होते. महादेव जानकर, राम शिंदे व डॉ.विकास,महात्मे हे राज्य सरकारचे हस्तक आहेत. हे जोपर्यंत सरकारमध्ये आहेत तो पर्यंत धनगर समाजास आरक्षण मिळणार नाही. मराठा समाज्याच्या आमदार खासदारांचा आदर्श घेवून जाणकर, शिंदे व महात्मे यांनी समाज्याच्या प्रश्नावर राजीनामा द्यायला हवा. भाजपा सरकार कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकारपेक्षा निर्लज्ज निघाले. यांना त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल. आपल्या न्याय हक्कासाठी लढा अधिक तीव्र स्वरुपाचा करावा लागेल असे खेमनर म्हणाले.
राज्य घटनेने दिलेले अनुसुचित जमातीचे (एसटी) आरक्षण राज्य व केंद्र सरककारच्या नाकर्तेपणामुळे सत्तर वर्षे रखडले आहे. घटनेने दिलेल्या न्याय हक्काची अंमबजावणी राज्य व केंद्र सरकारने पार पाडण्याची गरज असतांना सरकारने धनगर समाजाची घोर फसवणूक केली आहे. भाजपा सत्तेवर आल्यानंतर पंधरा दिवसात आरक्षण देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली होती. खोट्या घोषणा करुन देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाज्याची घोर फसवणूक केल्याचे दिलीपराजे सातव म्हणाले.
summary…dhangar-community-protest-for-reservation































































