
शिक्षण व सरकारी नोकरीमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करणाऱया याचिकांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न एका याचिकाकर्त्याने सोमवारी केला. त्यावर न्यायालयाने त्या याचिकाकर्त्याला चांगलेच खडसावले. या याचिकेत हस्तक्षेप करण्याचा तुमचा संबंधच काय, असा सवाल करीत न्यायालयाने याचिकाकर्त्याला स्वतंत्र याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले. वनवासी कल्याण आश्रमातर्फे ऍड. गार्गी वारूंजीकर यांच्यासह अन्य दोघांनी हस्तक्षेप याचिका दाखल केल्या होत्या.
























































