धारावी पुनर्विकासाचा प्रश्न उद्धव ठाकरेच सोडवतील, धारावी पुनर्विकास समितीचा विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धारावी पुनर्विकास प्रकल्प, धारावीकरांचे आंदोलन आणि न्याय्य मागण्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाणीव आहे. त्यांनी धारावीकरांच्या हक्काच्या लढय़ाला नेहमीच पाठिंबा दिला. लढय़ाचे नेतृत्वही त्यांनी केले आहे. गेल्या 15 वर्षांपासून पुनर्विकासासाठी धारावीकरांचा सुरू असलेला लढा त्यांना माहीत आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरेच धारावी पुनर्विकासाचा प्रश्न सोडवतील असा ठाम विश्वास धारावी पुनर्विकास समितीने व्यक्त केला.

धारावी पुनर्विकासाचे काम त्वरित सुरू करावे यासाठी धारावीतील वीस हजार झोपडपट्टीधारकांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नागपूर अधिवेशनादरम्यान देण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर जानेवारीतच बैठक आयोजित केली जाईल आणि बैठकीसाठी धारावी पुनर्विकास समितीच्या पदाधिकाऱयांनाही बोलावण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर बैठक आयोजित करून धारावी पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी झोपडपट्टीवासीयांच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र कोरडे यांनी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.