धुळे कॅशकांड, खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश

धुळ्य़ातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातून ताब्यात घेण्यात आलेल्या एक कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपयेप्रकरणी आता तपास यंत्रणेने खंडणी गोळा केल्याच्या कलमासह दखलपात्र गुह्याची नोंद करावी, असा आदेश आज प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱयांनी दिला आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्देशानंतर आज मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या समोर गोटे यांच्या फेरविचार अर्जावर सुनावणी झाली.

शासकीय विश्रामगृहात 21 मे रोजी रात्री बेहिशेबी रक्कम आढळली होती. त्यावेळी संबंधित खोलीची तपासणी करून रक्कम ताब्यात घ्यावी आणि कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार अनिल गोटे यांनी केली होती. या गुह्याबाबत झालेल्या चुकांबाबत न्यायालयात पुन्हा दाद मागणार असल्याचे गोटे यांनी सांगितले.