धुरंधर- 2 ची कमाई सुसाट, भल्या भल्यांना नमवत चित्रपट ठरतोय अव्वल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर २ ने अनेक मोठ्या नावांना मागे टाकले आहे. खान आणि कपूर यांचे कमाईचे विक्रम मोडत, हा चित्रपट वेगाने मुसंडी मारताना दिसत आहे. सोमवार हा खूप मोठा दिवस असतो. हा कामाचा दिवस असतो, आठवड्याचा पहिला दिवस, जो सहसा चित्रपटांसाठी बॉक्स ऑफिसवर कमी कमाईचा असतो. ट्रेड ट्रॅकर सॅकनिल्कनुसार, रणवीर सिंगच्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने सोमवार, २३ मार्चला रात्री ८ वाजेपर्यंत अंदाजे ₹३८.७१ कोटींची कमाई केली आहे. यामुळे चित्रपटाची हिंदुस्थानातील एकूण कमाई सध्या ₹४९२.८३ कोटी झाली आहे. ही आकडेवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंतची आहे. पुढील अपडेट्सनुसार, कमाई ₹५०० कोटींच्या जवळपास पोहोचण्याची शक्यता आहे.

देशांतर्गत कमाईने ५०० कोटींचा टप्पा ओलांडल्यामुळे, तसेच एकूण ६०० कोटी आणि जगभरात ८०० कोटींची कमाई केल्यामुळे, हा चित्रपट बॉलिवूडचा एक नवीन ‘ब्लॉकबस्टर’ ठरला आहे. आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर २ ने पाचव्या दिवशी एकूण २० हजार ३८२ शोजमधून सरासरी ४४.१% प्रेक्षकांची उपस्थिती होती. ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाच्या वीकेंड कलेक्शनला मागे टाकले आहे.

ट्रेड वेबसाइट सॅकनिल्कनुसार, या चित्रपटाने जगभरात ₹८०० कोटींची कमाई केली असून, ‘चावा’ आणि ‘पीके’च्या लाईफटाईम कलेक्शनला मागे टाकले आहे. चित्रपटाने हिंदुस्थानात एकूण ५१९.१२ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली असून, एकूण कमाई ६१९.७६ कोटी रुपये झाली आहे. या चित्रपटाने परदेशातील बाजारपेठांमध्ये २१० कोटी रुपये (अंदाजे २.१ अब्ज डॉलर्स) कमावले आहेत. त्यामुळे जगभरातील एकूण कमाई ही ८२९.७६ कोटी रुपये झाली आहे. पाच दिवसांच्या कमाईच्या बाबतीत हा चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर आहे.