नवरात्रीत उपवास करणाऱ्या मधुमेहींनी कोणती काळजी घ्यावी

1908

नवरात्रौत्सव दोन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. यामुळे सगळीकडे आता नवरात्रीची लगबग बघायला मिळत आहे. या दिवसात नऊ दिवस देवीची आराधना केली जाते. यासाठी उपवास केले जातात. पण हे उपवास करताना मधुमेही व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. असोसिएशन ऑफ फिजिशियन इंडीया या जर्नलमध्ये याबद्दल काही मार्गदर्शक टीप्स देण्यात आल्या आहेत.

त्यात रक्तात साखरेचे प्रमाण 70 मिली ग्रॅम पेक्षा कमी असेल तर उपवास करू नये असे सांगण्यात आले आहे.

तसेच टाईप 2 मधुमेह असलेल्या व्यक्तींनी हे उपवास करण्यास हरकत नाही. पण तरीही या दिवसात डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधांच्या प्रमाणात काही बदल करावे असे या जर्नलमध्ये सूचित करण्यात आले आहे.

उपवास सुरू करण्याआधी फळ, डाळी, धान्य, कडधान्ये असा प्रोटीन युक्त आहार घ्यावा असा सल्लाही यात देण्यात आला आहे.

तसेच जर तुम्हांला उपवासात पाणी पिणे वर्ज्य असेल तर उपवास सुरू होण्याआधीच द्रव पदार्थांचे सेवन करावे.

इन्सुलिन घेणाऱ्या रुग्णांनी डॉक्टरांना विचारुनच या दिवसात कमी जास्त मात्रा घ्याव्यात.

आपली प्रतिक्रिया द्या