क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांना गुगलचा सलाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानी कसोटी क्रिकेट संघातील महान खेळाडू दिवंगत दिलीप सरदेसाई यांची आज ७८वी जयंती आहे. या निमित्त गुगलने आज डुडलद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. फिरकी गोलंदाजांची जोरदार धुलाई करणारा क्रिकेटपटू अशी त्यांची विशेष ओळख होती.

दिलीप सरदेसाई यांनी १९५९-६०च्या दरम्यान आंतरमहाविद्यालयीन रोहिंटन बॅरिआ ट्रॉफीमध्ये खेळताना ४३५ धावा ठोकून आपली खेळी दाखवून दिली. १९६०-६१मध्ये त्यांना फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. पुण्यात पाकिस्तान विरुद्ध खेळताना त्यांनी १९४ मिनिटात ८७ धावा केल्या होत्या. रणजी ट्रॉफीसाठी मुंबईचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडण्यात आलेल्या पहिल्या पाच क्रिकटपटूंमध्ये ते एक होते. २ जुलै २००७मध्ये त्यांचे निधन झाले.

dilip-sardesai