वेंगसरकर पुन्हा निवड समितीवर येणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे सौरभ गांगुलीच्या हातात आल्यानंतर अपेक्षेप्रमाणे संघटनेतील घडामोडींना वेग आला आहे. दिवस-रात्र कसोटीला विरोध करणारी बीसीसीआय यंदा 22 नोव्हेंबरला आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. त्याआधीच हिंदुस्थानी संघाच्या निवड समिती प्रमुखपदी पुन्हा एकदा माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

एमएसके प्रसाद सध्या ‘बीसीसीआय’च्या संघ निवड समितीचे प्रमुख आहेत, मात्र लोढा समितीने दिलेल्या शिफारशींनुसार आणि सध्याच्या समितीमधील माजी खेळाडूंचा अनुभव पाहता प्रसाद यांच्या सहकाऱयांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. याआधी 2006 ते 2008 दरम्यान वेंगसरकर निवड समितीचे प्रमुख होते. वेंगसरकरांच्या कार्यकाळातच विराट कोहलीला ‘टीम इंडिया’मध्ये स्थान मिळाले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी प्रमुखपदावर निवड होण्याची शक्यता बळावली आहे. नोक्हेंबरच्या तिसऱया आठकडय़ात बीसीसीआयची सभा होणे अपेक्षित आहे. या सभेत नवीन निवड समितीबद्दल निर्णय घेतला जाऊ शकतो. असा निर्णय झाला तर नवीन समितीवर दिलीप वेंगसरकर यांची वर्णी लागणार काय? याकडे तमाम क्रिकेटतज्ञांचे लक्ष असेल.