गोरेगाव पूर्व येथील सुपर मार्केटमध्ये दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या तिघांना दिंडोशी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. मोहमद अली अन्सारी, सलमान अन्सारी आणि नफीस चौधरी ऊर्फ चपटा अशी त्या तिघांची नावे आहेत. या तिघांविरोधात गुन्हे दाखल आहेत.
गोरेगाव पूर्व येथे सुपर मार्केट आहे. त्या सुपर मार्केटमध्ये काही जण दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती दिंडोशी पोलिसांना मिळाली. त्या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी तेथे साध्या वेशात पाळत ठेवली. रात्री तेथे सहा जण आले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. पोलिसांनी तिघांना पकडले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून दरोडय़ाचे साहित्य जप्त केले. मोहमदविरोधात सात, सलमानविरोधात आठ आणि नफीस विरोधात तीन गुन्हे दाखल आहेत.