मुळशी पॅटर्नमध्ये झळकणार दीप्ती धोत्रे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मी शिवाजी पार्क या सिनेमानंतर अभिनेत्री दीप्ती धोत्रे आता प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ’मुळशी पॅटर्न’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात ती सविता मालपेकर आणि मोहन जोशी यांच्या मुलीची भूमिका साकारत आहे. दीप्तीचा जन्म सोलापूरच्या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला असून लहानपणापासूनच अभिनेत्री होण्याचे तिचे स्वप्न होते. करियरच्या सुरुवातीला तिने काही जाहिरातींसाठी डबिंग केले. त्यानंतर रंगमंचावर काम केल्यानंतर तिने सिनेमाची वाट धरली. आगामी काळात ती शिवाजी लोटन पाटील यांच्या भोंगा सिनेमातही झळकणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत मला अजून लांबवरचा पल्ला गाठायचा आहे. ठरावीक भूमिकांच्या चौकटीत न अडकता विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या हृदयात घर करायचे असल्याचे ती सांगते. मराठी सिनेमांचे यश फक्त फेस्टिवलपुरते मर्यादित न राहता त्याला व्यावसायिकदृष्टय़ा देखील यश मिळाले पाहिजे, असे मतही तिने व्यक्त केले.