
बॉलिवूडमधील हॉरर चित्रपटांचे दिग्दर्शक श्याम रामसे यांचे बुधवारी निधन झाले. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.
90 च्या दशकामध्ये हॉरर चित्रपट बनवण्यामध्ये रामसे ब्रदर्श आघाडीवर होते. रामसे बंदर्सपैकी एक श्याम रामसे यांनी ‘गेस्ट हाऊस’, ‘सामरी’, ‘बंद दरवाजा’, ‘पुरानी हवेली’ आणि ‘वीराना’ यासारख्या हॉरर चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. गेल्या काही काळापासून ते न्यूमोनिया या आजाराने त्रस्त होते. रामसे यांच्या पश्चात साशा आणि नम्रता या दोन मुली आहेत.
चित्रपट निर्माते सुमित काडेल यांनी सोशल मीडियाद्वारे श्याम रामसे यांना श्रद्धांजली वाहिली. रामसे यांनी अनेक हॉरर चित्रपट दिले, असे ते म्हणाले. तसेच अतुल मोहन यांनीही हॉरर चित्रपटाचे किंग श्याम रामसे यांचे न्यूमोनियाने निधन झाल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली. श्याम रामसे यांचा 17 मे, 1952 ला जन्म झाला होता. त्यांनी बंद दरवाजा आणि विरानासह एकूण 30 चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
Sad News:
King of the horror movies, Shyam Ramsay, at age 67, passed away today morning, following a bout of pneumonia. Born on May 17, 1952, he directed over 30 films including #BandhDarwaza, #Veerana. He was also known for the TV series #ZeeHorror Show. RIP #ShyamRamsay pic.twitter.com/WClP0yK4hO— Atul Mohan (@atulmohanhere) September 18, 2019
RIP #ShyamRamsay ji. He had given us many memorable horror films. Heartfelt condolence to the bereaved family. pic.twitter.com/kBhaSH9dfZ
— Sumit kadel (@SumitkadeI) September 18, 2019
























































