ब्रिटिश पत्रकार फ्रँक गार्डनर यांना विमानात गैरसोयींचा सामना करावा लागला. दिव्यांग असलेले फ्रँक गार्डनर यांना व्हीलचेअर उपलब्ध न झाल्याने विमानात टॉयलेटपर्यंत जाताना अक्षरशः जमिनीवर सरपटत जावे लागले. याबद्दल गार्डनर यांनी एक्सवर पोस्ट लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली.
वॉरसा (पोलंड) येथून फ्रँक गार्डनर विमानाने मायदेशी परतत होते. पोलिश एअरलाईन्सच्या विमानात टॉयलेटपर्यंत जाण्यासाठी व्हीलचेअर उपलब्ध नव्हती. ऑनबोर्ड व्हीलचेअरची सुविधा नसल्याचे त्यांना क्रू मेंबर्सनी सांगितले. केबिन क्रूनी त्यांना मदत केली, मात्र या परिस्थितीला एअरलाईन्सचे धोरण जबाबदार असल्याची टीका फ्रँक यांनी केली.