शनिशिंगणापूर देवस्थानवर जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती

शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थान आता शासनाच्या थेट नियंत्रणाखाली आले असून, जिल्हाधिकाऱ्यांची तात्पुरते प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर देवस्थानचे दैनंदिन व्यवहार, वित्तीय व्यवस्थापन, संपत्तीचे संरक्षण आणि भाविकांना दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधांची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर असेल, असेही शासनाने म्हटले आहे. ही तात्पुरती नियुक्ती शासनस्तरावर समिती गठित होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंतच लागू राहणार आहे. शनिशिंगणापूर देवस्थानसंदर्भातील घोटाळ्याचा विषय पुढे आलेला होता. तेथील सामाजिक कार्यकर्ते विशाल सुरपुरिया, ऋषिकेश शेटे, माजी विश्वस्त वैभव शेटे यांनी देवस्थानच्या कारभाराविरोधात, तसेच बनावट ऍपसंदर्भात कोटय़वधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती.