
देवरूख पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचा जिल्हा विशेष कारागृहात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीचा मृत्यू का झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मद्यपान केलेल्या अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घातल्याप्रकरणी देवरूख पोलिसांनी सखाराम गोरूले (67) याला अटक केली होती. जिल्हा विशेष कारागृहात असताना त्याचा मृत्यू झाला. यापूर्वी सखाराम गोरूले 14 वर्षांची शिक्षा भोगून हारपुडे गावी आला होता.



























































