दिव्यांग भक्ताची जुन्नर ते मार्लेश्वर पदयात्रा

27

सामना प्रतिनिधी । देवरुख

जुन्नर ते मार्लेश्वर हे अंतर धडधाकट माणसाला कापणेही कठीण आहे. मात्र, एका 49 वर्षाच्या दिव्यांग शिवभक्ताने हे अंतर सहज पार केले आहे. खंडू सरजिने असे त्यांचे नाव असून, गेल्या 14 वर्षांपासून ते अव्याहतपणे जुन्नर ते मार्लेश्वर असा पायी प्रवास करत आहेत. याही वर्षी ते पायी प्रवास करून मार्लेश्वरला श्री देव मार्लेश्वरराच्या यात्रोत्सवासाठी पोहोचले आहेत. सरजिने यांच्या अचाट जिद्दीची दखल घेऊन संगमेश्वररातील ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत आणि सत्कार केला आहे.

जुन्नर येथील अलदरे गावातील सरजिने यांना शालेय जीवनातच अर्धांगवायूचा झटका आला आणि त्याची उजवी बाजू पूर्णतः निकामी झाली. त्या वेळी उपचार केल्याने ते काही अंशी बरे झाले. मात्र, अजूनही त्यांची उजवी बाजू म्हणावी तशी काम करत नाही. याही अवस्थेत त्यांनी जुन्नर ते मार्लेश्वउर हा शेकडो किमीचा प्रवास पायी यशस्वी केला आहे. यंदाची 12 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या मार्लेश्वर यात्रेसाठी त्यांनी 26 नोव्हेंबर 2018 पासून पायी प्रवास सुरू झाला. दररोज 10 ते 13 किमी अंतर कापत ते इथवर पोचले.
याविषयी सांगताना सरजिने म्हणाले, ‘नोव्हेंबर ते जानेवारी या पायी प्रवासात दररोज रात्री वाटेत येणारी मंदिरे, धार्मिक स्थळे, धर्मशाळा याठिकाणी वास्तव्य केले आणि हा प्रवास केला.

आपली प्रतिक्रिया द्या