दिवाळी अंक 2020

ग्रहवेध

नावाप्रमाणेच ग्रहवेध घेणारा हा दिवाळी अंक आहे. कोरोनाने जगभरात थैमान घातले आह़े चीनमधून आलेला हा रोग जगभर कसा पसरला, कधी आटोक्यात येईल याचा अंदाज ज्योतिषीय चष्म्यातून कोरोना या लेखाद्वारे वंदना तेंडुलकर यांनी बांधला आह़े चीनची लग्नरास वृश्चिक तर चंद्ररास मकर आह़े कोरोना आला तेव्हा 26 डिसेंबर 2019 रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण होत़े त्यावेळी वृश्चिक लग्नराशीमध्ये कुंडलीच्या द्वितीय स्थानी ग्रहण व अमावस्या योग होत़ा, अशी चीनची कोरोना कुंडली मांडण्यात आली आह़े तसेच कोरोनाच्या काळातील न्यूयॉर्कची कुंडली, आपल्या देशाची कुंडलीसुद्धा त्यांनी या लेखातून मांडली आह़े मनुष्य जीवनात सर्वात महत्त्वाचे ठरते ते कर्म़ कुंडलीतील दशम भावावरून जातकाचे कर्म अभ्यासता येत़े आयुर्दायाच्या नियमावरून जातकाचे आयुष्यमान लक्षात येत़े जातकाच्या मध्यायु या टप्प्यावर कर्मस्थानाला काही बाधा पोहोचते का याचा अभ्यास कर्मस्थान-आयुर्दायाच्या नजरेत या लेखातून चित्तरंजन कुलकर्णी यांनी केला आह़े या लेखात त्यांनी मीनाकुमारी, स्मिता पाटील, भक्ती बर्वे, मधुबाला, इरफान खान, सुशांतसिंह राजपूत आदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या कुंडल्या अभ्यसल्या आहेत़ याशिवाय या अंकात ड़ॉ माधुरी देशमुख यांचा ग्रहपीडा व उपाय, ड़ॉ गीता पेंडसे यांची नक्षत्रकथा, प्रज्ञा कुळकर्णी यांचा अतिंद्रिय शक्तिसाधना, भारती काळे यांचे वर्षेभविष्य, वृषाली सदावर्ते यांचा स्त्र्ााrस्वभाव व त्यामागचं शास्त्र्ा, प्रफुल्ल पवार यांचा पाताळलोक, प्रकाश प्रसादे यांचा मंत्र ओंकार, तंत्र ओंकार, यंत्र ओंकार असे विविध विषयांवरील लेख या अंकाद्वारे वाचकांच्या भेटीला आले आहेत़ या अंकाचे यंदाचे हे तिसरे वर्ष आह़े

संपादक- ड़ॉ उदय मुळगुंद, किंमत-200 रुपये

अक्षरभेट

अक्षरभेट दिवाळी अंक विविधतेने सजलेला आहे. डॉ. दत्ता भोसले यांची एक होता राजा, फ. मु. शिंदे यांची रान पेरायचं नाही, चंद्रकुमार नलगे लिखित हे रेखिले कुणी या कथा वाचनीय आहेत. या अंकात ज्येष्ठ कवी दिलीप पांढरपट्टे यांची गजल, सौमित्र यांची आपण खूप खूप प्रयत्न करतो, महेश केळुस्कर यांची दिस अखेरचे, नीलावती कांबळे यांची वेदनांचा थवा ही कविता विशेष लक्षवेधी आहे. वैज्ञानिक दृष्टीचा जागर या लेखातून मंजुळा यादव यांनी विज्ञानाची सफर घडवली आहे. कोरोना परिस्थिती ओढवल्यामुळे कोलमडलेली आरोग्य व्यवस्था यावर वसंत देशपांडे यांनी मार्गदर्शन केले आहे. ग्रामीण भागातील कोलमडलेली आरोग्य व्यवस्था सुधीर कुलकर्णींच्या लेखात वाचता येईल. कोरोना परिस्थितीवर भाष्य करणारे उन्मेष गुजराथी, प्रकाश मळेवाडकर, सुधीर सुखटणकर, विष्णू काकडे, धुंडीराज जोशी, प्रवीण पुरी, प्रकाश मळेवाडकर, दत्ता कुलकर्णी, विष्णू काकडे यांचे लेख उल्लेखनीय आहेत.

संपादक-सुभाष सुर्यवंशी, किंमत – 120 रुपये.

screenshot_2020-11-24-20-51-50-672_com-facebook-katana

आहुती

आहुतीच्या यंदाच्या दिवाळी अंकात कोरोनाचे संकट या विषयावर विविध मान्यवरांचे लेख आहेत. आगंतुक पाहुणा कोरोना (देवेंद्र जैन), कोरोनासह जगावे लागेल (डॉ. राकेश पटेल), ऋणानुबंध (डॉ. पूर्वा प्रमोद अष्टपुत्रे) आदी लेखांसोबत अतिथी संपादक डॉ. समीर कुलकर्णी यांचा कोरोना काळ, योगेश त्रिवेदी यांचा कोरोना युद्धात जीवन मिशनचे मोठे योगदान, हेमंत गोगटे यांचा कोविड पश्चात उद्भवलेली आर्थिक परिस्थिती आदी लेख वाचनीय आहेत. प्रशांत असलेकर यांचा जरा विसावू या वळणावर हा लेखही छान आहे. शिवाय शंभर टक्के समाजकारण (अरविंद वाळेकर), मी जात नाही; जाणार नाही (विकास महाडीक), घरातून काम करा(अपर्णा पाटील) आणि श्रीकांत खाडे यांचा अखेर त्याने गाठलेच हे साहित्य वाचनीय आहे. तसेच गिरीश त्रिवेदी, प्रशांत मोरे, चंद्रशेखर भुयार, सागर नारकर यांचे लेखही माहितीपूर्ण आहेत.

संपादक – गिरीश त्रिवेदी, किंमत – 200 रुपये.

अर्थशक्ति

बँकिंग, विमा व गुंतवणूक या क्षेत्राला वाहिलेला अर्थशक्ति हा दिवाळी अंक आह़े या अंकात अनेकविध लेख आहेत़ त्यात प्रामुख्याने कोरोनाचा विविध उद्योग क्षेत्रांवर झालेला परिणाम, बँकांतील आर्टिफिशियल इंटलिजन्सचे भवितव्य, मेडिक्लेम पॉलिसीतील स्वागतार्ह बदल, धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड, अनधिकृत ठेवीविषयक व्यवसायांवर निर्बंध, संकटमोचक विमा पॉलिसी हे महत्त्वपूर्ण लेख आहेत़ नो युवर बँक या सदरामध्ये कॉसमॉस बँकेच्या अध्यक्षांची मुलाखत घेण्यात आली आह़े याशिवाय विविधा या विभागात डिपॉझिटरी, फिरते जग, पुस्तकांची परीक्षणे अशा वेगवेगळ्या विषयांमुळे अंकाची मांडणी वैविध्यपूर्ण झाली आह़े यशवंत सरदेसाई, अरविंद गाडेकर यांची कोरोनाविषयक व्यंगचित्रेही या अंकात आहेत़ सतीशकुमार सिंह, रमेश नार्वेकर, राजीव जोशी, वंदना धर्माधिकारी, विनायक कुळकर्णी, शशिकांत जाधव, विश्वासराव पालेकर, सुधाकर कुलकर्णी, देवदत्त धनोकर, मनोहर सावंत, श्रीरंग हिर्लेकर, स्मिता जोगळेकर आदींचे या अंकात लेख प्रसिद्ध करण्यात आले आहेत़

संपादक – रमेश नार्वेकर, किंमत – 75 रुपये

आपली प्रतिक्रिया द्या