धोनीची चिंता करू नका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
हिंदुस्थानच्या अजून तीन लढती बाकी असून त्यापैकी एका जरी लढतीत हिंदुस्थान विजयी झाला तरी सेमी फायलनचे तिकीट पक्के असणार आहे.

सामना ऑनलाईन, मँचेस्टर

धोनीने अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात परिस्थिती पाहून फलंदाजी केली. धोनी आणि केदार मैदानात असताना जर फटकेबाजी करायला गेले असते तर विकेट पडण्याची शक्यता होती. असे झाले असते तर संघाच्या कामगिरीवर त्याचा विपरीत परिणाम झाला असता. त्यामुळे धोनीची संथ खेळी आता आमच्यासाठी चिंतेचा विषय नाहीय. सर्व प्रशिक्षकवर्ग यामधून कसा मार्ग काढता येईल यावर काम करत आहेत. आम्ही धोनीशी बोलतोय. भविष्यात सारे काही ठीक होईल, असे प्रत्युत्तर टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनी धोनीवरील टीकेवर बोलताना दिले आहे.