
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ‘महाराष्ट्र भूषण’ डॉ. जयंत नारळीकर यांच्यावर बुधवारी दुपारी वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रासह अन्य विविध क्षेत्रांतील उपस्थित मान्यवरांनी डॉ. नारळीकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.