
कल्याण डोंबिवली महापालिकेने 14 एप्रिल पर्यंत औषधे ,दूध वगळता किराणा ,भाजी ,फळे विकण्यास बंदी घातली आहे. यामुळे येथील प्रसिद्ध फडके पथावर लहान गल्ल्यामध्ये भाजीचे ठेले ठेवून भाजी विक्रेते मुख्य रस्त्यावर गुपचूप भाजी घ्या भाजी स्वस्त भाजी असा पुकारा करत असल्याचे चित्र दिसत आहे.
विशेष म्हणजे डोंबिवलीत रोज कोरोना रुग्ण आढळत असून यामुळे काही भाग सील केले आहेत.
मुख्य रस्त्यावर बंदी घातल्याने भाजी वाले गल्ल्यांमध्ये भाजी विक्री करत आहे, भाजी गल्लीत ठेवून भाजीवाला मुख्यरस्त्यावर येऊन रिक्षावाल्यांसारखा भाजीची जाहिरात करतात . तरुण ते मध्यम वयातील स्त्री पुरुष अशा भाजीवाल्याकडे भाजी घ्यायला कुठलेही अंतर न ठेवता भाजी विकत घेत होते . काही जण रस्त्यावर मास्क गळ्यात अडकवून फिरत होते तर काहीजण चौकात उभे होते . प्लास्टिक च्या कमी दर्जाच्या पिशव्यांची विक्री खुलेआम सुरू होती .होमगार्ड कुठेही दिसत नव्हते या संदर्भात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून पोलीस ,पालिका कर्मचारी कुठेही दिसत नसल्याच्या तक्रारी केल्या या संदर्भात सहाययक पोलीस निरीक्षक राऊत यांना विचारले असता त्यांनी होमगार्ड बंदोबस्त असलंयाचे सांगून अधिक बोलणे टाळले.



























































